सातारा पालिका पुन्हा कुलूपबंद


 

करोना वगळता सर्व विभागांच्या कामाला सक्तीची सुट्टी

स्थैर्य, सातारा दि 11, दि. १२ : सातारा पालिकेच्या कार्यालयात करोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने शुक्रवारी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी पालिकेसाठी कोविड कक्ष वगळता तीन दिवसाची सक्तीची सुट्टी जाहीर केली .पालिकेचे एकापाठोपाठ नऊ कर्मचारी कोविड बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याने सातारा पालिका दुसऱ्यांदा लॉक डाऊन झाली आहे .

करोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पालिकेचे कामकाज रविवार, दि. १३ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत केवळ करोना विभागाचे कामकाज सुरू राहणार आहे. दरम्यान, सुरक्षिततेसाठी शुक्रवारी सकाळी पालिकेत निर्जजंतुर्कीकरण मोहीम राबविण्यात आली.

सातारा शहरात करोनाबाधित रुग्ण आढळून येण्यापूर्वीच पालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आरोग्यपूर्ण लढाईमुळेच शहरात करोनाचे संक्रमण रोखण्यास प्रशासनाला यश आले होते.  परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून सातारा जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा उद्रेक झाला अन् बाधितांची संख्या २२ हजारांवर पोहचली. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतही करोनाने शिरकाव केल्याने चिंतेचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत.

सर्वप्रथम करोना विभाग, त्यानंतर आरोग्य, पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू व आता शहर विकास विभागातील कर्मचाऱ्यांना करोनाची लागन झाली. सातारा पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात यावी अशी मागणी वाढू लागली आहे . बाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने पालिकेचे कामकाज रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी पालिकेच्या सर्वच विभागांत निजंर्तुकीकरण मोहीम राबविण्यात आली. पालिकेचा कानाकोपरा सोडियम हायपोक्लोराइडद्वारे स्वच्छ करण्यात आला. यानंतर पालिका कुलूपबंद करण्यात आली. करोना विभागाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, इतर सर्व विभागांचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत होईल. दि. ३ जुलै रोजी पालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याला करोनाची लागन झाली होती. त्यावेळी पालिकेचे कामकाज तीन दिवस बंद ठेवावे लागले होते. यानंतर पालिकेची कामे बंद ठेवण्याची ही दुसरी वेळ आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!