
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या शासकीय निवासस्थान परिसरातून चंदनाचे झाड चोरीप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रविवारी पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास चोरटयांनी झाड पाडून त्यातील सात हजार रुपये किंमतीचे 20 ते 25 इंच व्यासाचे मध्यम आकाराचे चंदनाचे खोड लंपास केले. याबाबत सुरक्षारक्षक गणपत बळी तुपे (वय 70) यांनी फिर्याद दिली. तपास पोलीस नाईक पी. एन. ढाणे करत आहेत.
