उपळेकर महाराज समाधी मंदिरात १५ फेब्रुवारीला संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण तालुका विश्व ब्राम्हण सोनार समाजाच्या वतीने शनिवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी उपळेकर महाराज समाधी मंदिर, फलटण येथे संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

उत्सवादिवशी सकाळी ९ ते १०.३० भजन, ११ ते ११.३० प्रतिमा पूजन, ११.३० ते १२ संत नरहरी गाथा, दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम, दुपारी १२.३० ते १ संतांची शिकवण, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

फलटण शहर आणि परिसरातील समाजबांधवांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!