
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, सातारा, दि. २१ : सातारा जिल्हा परिषदेत सदभावना दिवस साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुभाव विचारात घेऊन सर्व खातेप्रमुखांनी आपल्या कार्यालयातच सकाळी ११.०० वाजता सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रत्येक पंचायत समितीमध्ये साजरा करण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागामध्ये सातारा जिल्हा परिषद, साताराचे अध्यक्ष उदय कबुले यांनी स्व.राजीव गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून सदभावना दिवसाची प्रतिज्ञा सामान्य प्रशासन विभागातील सर्व कर्मचारी यांना दिली. कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.), मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन व जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
