फलटण उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते; प्रतिनिधी संघटनेकडून सत्कार

फलटण उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी नियुक्त सचिन विधाते यांचा प्रतिनिधी संघटनेने सत्कार केला. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. २३ जून : फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (Dy. RTO) म्हणून पदोन्नतीने नियुक्त झालेले सचिन विधाते यांचा फलटण प्रतिनिधी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून फलटणला आरटीओ कार्यालय मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या सत्कार प्रसंगी फलटण प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष अमोल सस्ते यांनी उपस्थित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना आरटीओ क्षेत्रातील कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.

फलटण तालुक्यातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करून फलटणमध्ये आरटीओ कार्यालय मंजूर केले होते. या महत्त्वपूर्ण कामाबद्दल प्रतिनिधी संघटनेच्या वतीने आभार मानले गेले.

यावेळी फलटण प्रतिनिधी संघटनेचे पदाधिकारी, सर्व सभासद आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!