
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२६ | सातारा |
पायरीजवळ पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना वाढे, ता. सातारा येथे मंगळवारी सकाळी घडली. शिवार्थ मनोज नलावडे (वय १ वर्ष ३ महिने, रा. वाढे, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत वडील मनोज प्रकाश नलावडे (वय ३४, रा. वाढे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
गावातील मोहन जाधव यांच्या घराच्या पायरीला लागून शिवार्थ हा पालथा पडलेला दिसला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शिवार्थ हा एकुलता एक होता. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती व कानातून रक्तस्त्राव होत होता.
तो नेमका कसा पडला, हे कोणीही पाहिले नाही, असे तपासी अधिकारी हवालदार रामचंद्र गोरे यांनी सांगितले.