
वाठार निंबाळकर येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या निधीतून १ कोटी ७० लाखांच्या विविध विकासकामांचे नुकतेच भूमिपूजन झाले.
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
शाळा, रस्ते आणि पाणी प्रकल्पांचा समावेश
या मोठ्या निधीतून गावातील अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये ४५ लाख रुपये खर्चाच्या जिल्हा परिषद शाळेच्या तीन नवीन वर्गखोल्या, ५० लाखांचा तरटे वस्ती रस्ता, २६.५ लाखांचा सांडपाणी व्यवस्थापन व फिल्टर प्रकल्प आणि १५ लाखांच्या ढोक वस्ती येथील अंगणवाडी इमारतीचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय ननावरे वस्ती, करवे घर ते लक्ष्मी मंदिर, पारखे घर ते जालिंदर जाधव घर आणि आतार घर ते पुंडेकर घर या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व खडीकरण केले जाणार आहे.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या सर्व विकासकामांमुळे वाठार निंबाळकरच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी रेश्मा बोडरे, विशाल बनकर, दत्तात्रय मदने, विकास तरटे, नंदकुमार नाळे, संदीप निंबाळकर, शशिकांत निंबाळकर, विक्रांत शिंदे, प्रदीप मुळीक, संजय शिंदे, दत्तात्रय जगदाळे, सचिन कुदळे, विजय कोरडे, केशव तरटे, रमेश उराडे या ग्रामपंचायत सदस्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
