दिल्ली अन् मुंबईतील तरुणींना अनैतिक कृत्यासाठी आणले सातार्‍यात

दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२६ | सातारा |
दिल्ली अन् मुंबईतील दोन तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर मानवी अनैतिक व्यापार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सेामवारी शहरातील एका हॉटेलवर घडला.

संकेत सुरेश चाफेकर (रा. शिवथर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

शहरातील एका हॉटेलवर संबंधित तरुणींना संशयिताने व्यवसायासाठी आणले. वेश्यागमनाचा मोबदला स्वतःच्या उपजीविकेसाठी घेऊन पीडित तरुणींना ग्राहकांसमोर वेश्यागमनासाठी उद्युक्त केले. या कमाईतील मिळकतीवर संशयिताने अवलंबून राहून वेश्या व्यवसायास प्रेरणा दिली, असेही पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली असून, त्यातील एक तरुणी २६ वर्षांची आहे. ती शिक्षण घेत असून, ती दिल्लीची आहे. तर दुसरी तरुणी मुंबईची असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे हे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!