फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन निंबाळकर, उपाध्यक्षपदी संजय जामदार बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आदर्की खुर्द, ता. फलटण येथील साप्ताहिक स्वराज अ‍ॅग्रोचे कार्यकारी संपादक सचिन निंबाळकर यांची तर उपाध्यक्षपदी कोळकी, ता. फलटण येथील दैनिक सकाळचे पत्रकार संजय जामदार यांची तर सचिवपदी आसू, ता. फलटण येथील दैनिक सकाळचे पत्रकार अशोक सस्ते यांची एकमताने निवड करण्यात आली.

शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता माळजाई मंदिर, फलटण येथे फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक झाली. बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ पदाधिकारी निवडीवेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीरंग पवार, सातारा जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य मुगुटराव कदम, माजी अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, अशोक सस्ते, संजय जामदार, सचिन निंबाळकर, सुभाष सोनवलकर, आनंद पवार यांची उपस्थिती होती.

बैठकीत शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय, पुणे विभागीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांबाबत चर्चा करण्यात आली.

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची एकजूट आणि त्यांच्या सहकार्याने संघटनेच्या विविध उपक्रमांची पुढील वाटचाल अविरत सुरू ठेवण्यास आपण सर्व सदस्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने आपण सर्वजण संघटनेचे विविध उपक्रम मोठ्या जोमाने सुरू ठेवाल, असा विश्वास संघटनेचे पुणे विभागीय संपर्कप्रमुख श्रीरंग पवार यांनी यावेळी व्यक्त केला.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!