लॉकडाउनमुळे वडूज शहरातील रस्ते सुने सुने


स्थैर्य, वडूज, दि. १९ : करोना संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवार, दि.22 पर्यंत पूर्णतः लॉकडाउनचे अध्यादेश जारी केले. त्या अनुषंगाने खटाव तालुक्यातील प्रशासनाने गंभीर दखल घेत प्रत्येक गावात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने रस्ते सुने सुने झाले.

खटाव तालुक्यातील 144 महसुली गावात स्थानिक पातळीवरील प्रशासनाने या अध्यादेशाची कडक अंमलबजावणी केली आहे.  तालुक्यातील बाधित गावांमध्ये संबंधित प्रशासन सतर्क असून साखळी वाढू नये यासाठी तालुका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. यापूर्वी काही अपवाद वगळता तालुक्यातील बाजारपेठ सुरू होत्या. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात देखील  करोना   बाधित रुग्ण आढळल्याने काही भाग कंटेेंंन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. मात्र उर्वरित बाजारपेठ सुरू होती.त्यामुळे शासकीय कार्यालये,बँका व दुकाने सुरू राहिल्याने शहरात वर्दळ होती. मात्र जिल्हा प्रशासनाने या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बुधवार, दि.22 पर्यंत पूर्णतः लॉकडाउनचे अध्यादेश जारी केले. त्यामुळे तालुक्यासह वडूज शहरातील रस्ते सुने सुने दिसू लागले 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!