एकसळ येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक नामदेव भोसले (दादा) यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कोरेगांव, दि. ०५ : एकसळ येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक नामदेव श्रीरंग भोसले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले.

सेवानिवृत्तीनंतर एकसळ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करुन त्यांना बिनविरोध-सरपंच करण्यात आले होते, अशा ऐतिहासिक घटनेने सुसंवादी व्यक्तिमत्वाची झळाकी झाल्याने आदराचे स्थान गांवात निर्माण झाले होते. त्यांचे पश्चात एक विवाहित मुलगा, दोन सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे. कोरेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी कै. अशोक भोसले यांचे ते वङील होत. कष्टाळू स्वभाव सर्वांना आपलेसे करणारा असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सावडन्यचा, दशक्रीया आणि कार्य मंगळवारी होणार आहे. 

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!