इंटरनेट सेवा पूर्ववत; सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 14 सप्टेंबर 2023 | फलटण | खटाव तालुक्यामधील पुसेसावळी येथे घडलेल्या घटनेमुळे सातारा जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. याचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर बसत असून सर्वसामान्य जनतेचे सर्वच व्यवहार ठप्प झालेले दिसून येत होते. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर फलटण शहरासह तालुक्यामधील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

फलटण शहरासह तालुक्यामधील सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम यासारख्या सर्वच प्लॅटफॉर्म्सवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून कोणीही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की; गेल्या तीन दिवसांपासून फलटण शहरासह तालुक्यामधील सर्वच भागांमधून अचानक इंटरनेट सेवा बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसू लागला होता.

इंटरनेट सेवा बंद झाल्याने सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा यामध्ये इंटरनेट बँकिंग, फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारखे सर्व प्लॅटफॉर्म्स यासोबतच सर्व शासकीय कार्यालय म्हणजेच लागणारे दाखले त्यानंतर सर्व प्रकारचे उतारे यासोबतच इतर सहकारी संस्था व त्यांचे कार्यालयीन कामकाज संपूर्णतः ठप्प झालेले दिसून आले.

फलटण शहरासह तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक युवकांसह नागरिकांनी बारामतीला जात इंटरनेट सुरु करून नक्की काय घटना घडली आहे व आपल्या भागामधून काय शेअर होत आहे ? याची माहिती घेतली.


Back to top button
Don`t copy text!