भिलकटी गावच्या हद्दीत दोन गाईंची सुटका; प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
भिलकटी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत वडजल ते भिलकटी जाणारी रस्त्यावर प्राण्यांचा छळ केल्या प्रकरणी युवराज शंकर खलाटे (वय ४१, राहणार शिंदेवाडी, तालुका फलटण) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फलटण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भिलकटी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत वडजल ते भिलकटी जाणारी रस्त्यावर काल सायंकाळी ४.१५ वाजता एक पांढर्‍या रंगाची चारचाकी पिकअप (क्र. एमएच११बीएल८३१७) युवराज शंकर खलाटे हा १ लाख रुपये किमतीच्या दोन देशी गाई जिवंत अंदाजे सात ते आठ वर्ष वयाच्या यांना चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने कमी जागेमध्ये निर्दयपणे दाटीवाटीने भरून घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन देशी गाईंसह एकूण ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी युवराज खलाटे याच्याविरोधात प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा पोलीस फौजदार हांगे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!