महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा फलटणचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा फलटणचे भव्य दिव्य त्रैवार्षिक अधिवेशन २५ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी नूतन शिक्षक नेते संभाजी बिटले, तालुका नेते रामचंद्र बागल, अध्यक्ष संतोष कोळेकर, सरचिटणीस निलेश कर्वे, कार्याध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रशांत खताळ, उपाध्यक्ष विक्रम घाडगे, उपाध्यक्ष दत्ता शिंगटे, प्रसिद्धी प्रमुख संदीप भोसले, विभागीय उपाध्यक्ष किशोर तळेकर, सहसचिव किरण बोबडे, संघटक परमेश्वर कांबळे, तसेच नूतन महिला कार्यकारिणी – महिला शिक्षक नेत्या तिलोत्तमा लोखंडे मॅडम, अध्यक्ष सौ. जयश्री कदम मॅडम, सरचिटणीस शोभा झेंडे मॅडम, कार्याध्यक्ष सारिका खताळ मॅडम, उपाध्यक्ष उषा माने मॅडम, कोषाध्यक्ष वनिता गायकवाड मॅडम, सहसचिव अनुराधा लंभाते मॅडम, विभागीय उपाध्यक्ष सौ. विजया पोमणे मॅडम, प्रसिद्धी प्रमुख स्वाती गायकवाड मॅडम, संघटक शारदा अडसूळ मॅडम, सल्लागार नंदा वाणी मॅडम यांचा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर, सांगली जिल्ह्याचे नेते बाबा लाड, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन नवनाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस व शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, माजी जिल्हाध्यक्ष व निमंत्रित सदस्य जि. प. सातारा शंकरराव देवरे, कार्याध्यक्ष अनिल पिसाळ, उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार घाडगे या प्रमुख पदाधिकार्‍यांसह अनेक तालुकाध्यक्ष, आजी माजी संचालक व फलटण तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार कामगिरी दाखवलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!