जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु


 

स्थैर्य, सातारा दि.३०: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 3, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, दिव्यनगरी 1, विकासनगर 2, शाहुपूरी 1, भाग्यलक्ष्मी कॉलनी 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 1, सैदापूर 2, काशिळ 1, एकंबे 1, वंदन 1, विसावानाका 2, कोंडवे 2, कोडोली 1, शाहुनगर 1, शिवथर 2, वाढेफाटा 1, पाडळी 1, धनवडवाडी 1,

फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कोळकी 1, लक्ष्मीनगर 2, विद्यानगर 1, साखरवाडी 3, पिंपळवाडी 2, वाघोशी 1, मिरेवाडी 1, खामगाव 3, सुरवडी 1, रेवडी 1, होळ 1, कुंटे 1, फडतरवाडी 1, विढणी 3, हिंगणगाव 1, ढवळेवाडी 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, वडुज 1, नांदोशी 1,

माण तालुक्यातील पाणवन 7, जाशी 2,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 2,सुरली 1, 

जावली तालुक्यातील मेढा 1, ओझरे 1,

वाई तालुक्यातील सिध्दनाथवाडी 1, फुलेनगर 3, दत्तनगर 2, पसरणी 3, बावधन 1, सोनगिरवाडी 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,

बाहेरील जिल्ह्यातील जांब (पुणे) 1,

5 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वाढे ता. सतारा येथील 67 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, विहापुर ता. कडेगांव जि. सांगली येथील 70 वर्षीय पुरुष, आणे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला व रात्री उशीरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -248107

एकूण बाधित -51147 

घरी सोडण्यात आलेले -48380 

मृत्यू -1718 

उपचारार्थ रुग्ण-1049


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!