बँकिंग क्षेत्रात सुधारणा; बेंचमार्क निर्देशांकात वाढ


स्थैर्य, मुंबई, ७ : बँकिंग क्षेत्रात सुधारणा दिसल्यानंतर अस्थिर व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी काहीसा नफा कमावत वृद्धी घेतली. निफ्टी ०.१९% किंवा २१.२० अंकांनी वाढला व ११,३५५.०५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.१६% किंवा ६०.०५ अंकांनी वाढला व ३८,४२७.२३ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १२१२ शेअर्सनी वृद्धी घेतली, १४६१ शेअर्स घसरले आणि १८७ शेअर्स स्थिर राहिले. भारती इन्फ्राटेल (५.७५%), एचडीएफसी लाइफ (३.२८%), डॉ. रेड्डीज लॅब्स (२.५२%), आयटीसी (१.९३%) आणि हिंदुस्थान युनिलिव्हर (१.९०%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर एमअँडएम (३.४३%), युपीएल (२.६१%), बजाज फायनान्स (२.४७%), गेल (२.२४%) आणि एनटीपीसी (२.२२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

निफ्टी एफएमसीजी हा आज सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला. तर आयटी सेक्टरदेखील वाढीसह बंद झाले. ऑटो, बँक, एनर्जी, इन्फ्रा मात्र लाल रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप ०.७८% नी घसरले तर स्मॉलकॅपने ०.२०% नी घसरण केली.

तेजस नेटवर्क्स लि. : कंपनीने फायबर टू द होम जीपीओएन इक्विपमेंटसाठी स्टरलाइट टेक्नोलॉजीज आणि एलअँडटी कंस्ट्रक्शनकडून ३२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली. कंपनीचे स्टॉक्स वाढून ४.९७% नी वाढून ६४.४० रुपयांवर व्यापार केला.

मॅन इंडस्ट्रिज (इंडिया)लि. : कंपनीने नुकतेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कडून ३७० कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स २.३०% नी वाढले व त्यांनी ६२.४० रुपयांवर व्यापार केला.

व्होडाफोन आयडिया लि. : कंपनीने तिचा ब्रँड लोगो “Vi” हा एकत्रित केला, यातून दोन दूरसंचार कंपनीचा बोध होतो. यानंतर कंपनीचे स्टॉक्स २.९०% नी वाढून त्यांनी १२.४० रुपयांवर व्यापार केला.

स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लि. : कंपनीने ३०० मेगावॅट क्षमतेच्या देशातील दोन मोठ्या सौर प्रकल्पांसाठी ३०० दशलक्ष एयुडी ऑर्डरवर स्वाक्षरी केली. कंपनीच्या शेअर्समध्ये २.०५% ची वाढ झाली व त्यांनी २७४.३० रुपयांवर व्यापार केला.

स्टील स्ट्रिप्स व्हिल्स लि. :कंपनीने अमेरिका व युरोप ट्रेलर मार्केटसाठी जवळपास १२,००० चाकांची निर्यात ऑर्डर मिळवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.०२% नी वाढले व त्यांनी ४६०.०० रुपयांवर व्यापार केला.भारतीय रुपया: अस्थिर देशांतर्गत बाजारामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपया खालावला व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याने ७३.३५ रुपयांचे मूल्य कमावले.

भारतीय रुपया :अस्थिर देशांतर्गत बाजारामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपया खालावला व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याने ७३.३५ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार : आजच्या सत्रात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या मंदीमुळे युरोपियन स्टॉक्सनी उच्चांकी व्यापार केला तर आशियाई स्टॉक्सनी घसरणीचा व्यापार केला. नॅसडॅक, निक्केई २२५ आणि हँगसँगने अनुक्रमे १.२७%, ०.५०% आणि ०.४३% घट अनुभवली तर एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे १.२६% आणि १.५८% नी वृद्धी घेतली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!