स्टडीग्रुपच्या उत्तर अमेरिकन सहयोगी युनिव्हर्सिटीज टॉप १० टक्क्यांमध्ये सामील


दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । स्टडी ग्रुप ही विद्यार्थ्यांसाठी भारतातील अग्रगण्य जागतिक शिक्षण पुरवठादार कंपनी स्टेट्समध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकरिता प्रमुख कंपनी म्हणून उदयास आली आहे. आता विद्यार्थी आणि भागधारकांसाठी आनंदाचे आणखी एक कारण आहे, कारण कंपनीच्या उत्तर अमेरिकन सहयोगी युनिव्हर्सिटीज ४,५०० अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये अव्वल १० टक्क्यांमध्ये उदयास आल्या आहेत. यूएसमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी अग्रगण्य सहयोगी युनिव्हर्सिटीजमध्ये जेम्स मॅडिसन युनिव्हर्सिटी, बेलर युनिव्हर्सिटी, डीपॉल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ हार्टफोर्ड, फ्लोरिदा अटलांटिक युनिव्हर्सिटी, लिप्सकॉम्ब युनिव्हर्सिटी, लॉन्ग आयलँड युनिव्हर्सिटी, टेक्सास एअॅण्डएम युनिव्हर्सिटी, वेस्टर्न वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आदींचा समावेश आहे.

स्टडीग्रुपचे भारतातील प्रादेशिक संचालक करण ललित म्हणाले, “आम्ही आमच्या अमेरिकन सहयोगी युनिव्हर्सिटीजचे ते जगभरातील विद्यार्थ्यांना देत असलेल्या उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या मान्यतेसाठी अभिनंदन करतो. ही मान्यता या महत्त्वपूर्ण रँकिंग्जमधून दिसून येते. या युनिव्हर्सिटींमध्ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय अध्यापन व सहाय्यक शिक्षण वातावरणामधून फायदा होतो. ते वैविध्यपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचा भाग म्हणून समाजाचे ऋण देखील फेडतात. हा समुदाय यूएसमधील असो किंवा इतर देशांमधील असो सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अॅसेट आहे. आम्‍हाला आमचे पदवीधर त्यांच्या निवडलेल्या करिअर्ससाठी अशा सर्वोत्तम फाऊंडेशनचा लाभ घेत असल्याचा आनंद होत आहे, ज्यामुळे ही जगभरातील सर्वात मान्यताकृत संस्था आहे.’’


Back to top button
Don`t copy text!