सातारात जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.२१ : येथील सदाशिव पेठेमध्ये एका बेसमेंटमध्ये सुरू असणार्‍या जुगार अड्डयावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी 1 लाख 80 हजार 490 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी पाच जणांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी भाजी मंडई, सदाशिव पेठ, सातारा येथील गणपती मंदिरासमोर असणार्‍या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकला. हुसेन नवीलाल पठाण (वय 42, रा. सदरबझार, सातारा), प्रकाश नारायण गायकवाड (वय 52, रा. सोनगाव, ता. सातारा), तौफिक सलीम सय्यद (वय 33 रा. गुरुवार पेठ, सातारा), संतोष वाघमारे (वय 52, रा. एकता कॉलनी, करंजे, ता. सातारा), दत्तात्रय वामन जाधव (वय 45, रा. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा) हे पाचजण जुगार खेळताना पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार 490 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!