धोक्याची घंटा : शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यातील शेकडो शिक्षकांना कोरोनाची लागण


 

स्थैर्य, दि.२२: येत्या सोमवारपासून राज्यातील 9
वी ते 12 पर्यंतचे शालेय वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक
खबरदारी आणि उपाययोजना करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. शाळा सुरू
करण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षकांना कोरोनाची चाचणी केली
जात आहे. या चाचण्यांमध्ये राज्यातील शेकडो शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट
पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी 1393 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 8 शिक्षक तर एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहे.

बीड जिल्ह्यातील 6500 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात पहिल्या एक हजार चाचणीत 25 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

उस्मानाबाद
जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 786 शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे.
त्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात उस्मानाबाद शहरातील
श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यात आज 4 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 22 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

नागपूर
जिल्ह्यात आतापर्यंत 6823 शिक्षकांच्या RTPCR चाचण्या करण्यात आल्या आहेत.
यातील 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण भागात 25 शिक्षकांना
कोरोनाची लागण झाली असून नागपूर शहरात 16 शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले
आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह ?

>
औरंगाबाद – 9 > बीड – 25 > उस्मानाबाद – 48 > नांदेड – 8 >
अमरावती – 22 > सिंधुदुर्ग – 8 > कोल्हापूर – 17 > नागपूर – 25


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!