
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.२२ : नुने, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कण्हेर, ता. सातारा येथील एका 61 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुळशीदास रघुनाथ वाघमळे (वय 61, रा. कण्हेर, ता. सातारा) हे दुचाकीवरून एकटेच सातारा येथे कामासाठी गेले होते. काम उरकून ते परत जात असताना नुने, ता. सातारा येथील नंदिता माळ परिसरात दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
