राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी; काँग्रेस आमदाराचं विधान चर्चेत


दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या विरोधात अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे देशभरात सभा घेऊन लोकचळवळ उभी केली जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली सभा २० ते २५ एप्रिलदरम्यान नागपुरात घेण्याची तयारी सुरू आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दोन्ही नेते संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल होऊन मोदी सरकारने सुरू केलेल्या हुकूमशाहीला सडेतोड उत्तर देतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. दुसरीकडे एका काँग्रेस आमदाराने राहुल गांधींची तुलना थेट महात्मा गांधींसोबत केलीय.

छत्तीसगडचे काँग्रेस आमदार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत केली आहे. राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी आहेत. कारण, राहुल आणि महात्मा गांधी यांच्याच अनेक समानता आहेत. जसे की, महात्मा गांधी दांडी यात्रेतून चालले, त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून हजारो किमीचा प्रवास केला. तसेच, महात्मा गांधींप्रमाणेच राहुल गांधी हेही कोणालाही न घाबरता सत्य बोलत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सत्यनारायण शर्मा यांनी राहुल गांधींना राष्ट्रपुत्र म्हटलं होतं, त्यानंतर आता काँग्रेस आमदार अमितेश शुक्ला यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. तर, अदानी प्रकरणावरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. दरम्यान, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षांसोबत काँग्रेसने तिरंगा मार्च काढला. यानंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.


Back to top button
Don`t copy text!