
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि.१०: अनुसुचीत जातीतील महिलेला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करणार्या खेरडा (जि.परभणी) येथील ग्रामपंचायत सदस्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करुन कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी काठियावाडी मेहतर समाज विकास मंडळ, फलटणच्यावतीने प्रांताधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना मंडळाचे कार्याध्यक्ष राजु मारुडा, सेक्रेटरी मनोज मारुडा, खजिनदार रमेश वाघेला, सहसेक्रेटरी अनंत डांगे, सदस्य नितीन वाळा यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
खेरडा, ता.पाथरी, जि.परभणी येथील शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य दगडु अम्लु पाटील याने अनुसूचित जातीतील महिलेला मारहाण करुन शिवीगाळ केली व पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुन पाणी भरण्यास मनाई केली. या घटनेविरोधात संबंधित आरोपीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
