सेवानिवृत्त नायब तहसीलदार नंदकुमार गुरव यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि.१०:  सातारा येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार नंदकुमार गुरव यांचे दि.9 रोजी सकाळी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. मुळचे ते सातारा तालुक्यातील आरफळ येथील होते. –

नंदकुमार गुरव यांना किडनीच्या आजाराचा त्रास जाणवत होता. बरेच दिवस औषधोपचार सुरू होता . महसूल विभागात त्यांनी 38 वर्षे सेवा दिली होती. महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, विभागीय महसूल कर्मचारी समन्वय समितीचे विभागीय अध्यक्ष, सातारा जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेचे व सातारा जिल्हा सरकारी नोकर पतपेढीचे तसेच सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन चे संचालक, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेल चे उपाध्यक्ष, गुरव सेवा संघाचे पदाधिकारी अशा विविध संघटनांची महत्वाची पदे त्यांनी भूषविली होती.

संघटनात्मक व्यासंगी, दिलखुलास स्वभावाचे , कवी , लेखक असे ते होतं. किडनीच्या आजाराचा त्रासावर बरेच दिवस औषधोपचार सुरू होता. अशा स्थितीतही त्यांनी समाजसेवक म्हणून डॉक्टर मुलाच्या मदतीने ओरसिनिक औषध अनेक रुग्णांना देऊन स्वस्थ राहण्यासाठी हिम्मत दिली. अनेक रुग्णांना ते स्वतः फोनवरून माहिती देऊन हिम्मत देत होते. पण त्यांचाच आजार शेवटी जीवघेणा ठरला .


Back to top button
Don`t copy text!