रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२३ | फलटण |
महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळावे यासाठी फलटण तालुक्यातील रजनीकांत खटके हा युवक दि. १५ मार्च २०२३ पासून प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषणास बसलेला आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोमवार, दि. २० मार्च रोजी उपोषणस्थळी समक्ष भेट देऊन फलटण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व फलटण तालुका वंचित बहुजन आघाडी युतीच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यावेळी शिवसेना फलटण तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे, तालुका महिला आघाडी प्रमुख सुशीला जाधव, शहर संघटीका लता तावरे, शाखाप्रमुख मंगेश खंदारे, वंचित बहुजन आघाडीचे फलटण तालुकाध्यक्ष संदीप काकडे, छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकर विद्वत सभा सातारा जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष उमेश कांबळे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा अश्विनी अहिवळे, महिला आघाडी शहराध्यक्षा सपना भोसले, शहर उपाध्यक्ष किरण अहिवळे, अजित कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!