शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष


दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२३ | फलटण |
ग्रामपंचायत आळजापूरच्या इतिहासातील सर्वात कमी वयातील ‘युवा सरपंच’ म्हणून नोंद होणारे, कमी वेळेत ज्या भागातून निवडून आले त्या भागातील लोकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करून आता गावात विकासाची गंगा आणण्यात कटिबध्द असणारे, सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागणारे असे शांत, संयमी नेतृत्व श्री. शुभम बाळासाहेब नलवडे यांची आळजापूर गावच्या सरपंचपदी निवड झाली आहे.

या निवडीवेळी संतकृपा उद्योग समूहाचे संस्थापक श्री. विलासराव नलवडे, श्री. रवींद्र केंजळे, श्री. शंकर नलवडे पाटील, माजी सरपंच श्री. दिलीप नलवडे, श्री. बलवंतराव नलवडे (बिबी), जयवंत केंजळे, निवडणूक निर्णय अधिकारी इंगळे, ग्रामसेवक सापते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सर्व संस्थांचे पदाधिकारी, सोसायटी चेअरमन, संचालक मंडळ, परिसरातील बिबी, कापशी, आदर्की, घाडगेवाडी, टाकोबाईचीवाडी, वाघोशी या गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

आळजापूर गावच्या सरपंचपदी शुभम नलवडे यांची निवड झाल्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!