मतदार नोंदणीसाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतला विधानसभा मतदारसंघाचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील बूथनिहाय नवीन मतदार नोंदणी वाढवणे, घरोघरी सर्व्हे करून मतदारांची तपासणी करणे, मयताचे दाखले गोळा करुन मयत मतदार कमी करणे याबाबत फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात विशेष मोहिमेअंतर्गत आज सर्व मतदान केंद्र अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचा आढावा घेतला असून मतदार नोंदणी बाबत निर्देश दिले आहेत.

यामध्ये नविन मतदार नोंदणी, मयत मतदार वगळणे, अपंग मतदार नोंदणी, ओळखपत्र वाटप याबाबत फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात आढावा घेतला. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीचा आढावा घेतला.

यावेळी नगरपालिका आणि पंचायत समिती यांच्याकडून 2004 व 2005 मध्ये जन्माला आलेल्या मुलांची माहिती गोळा करून त्यांच्या नावाची नोंदणी सूरु करण्यात आली आहे. तसेच फलटण नगरपरिषद व फलटण पंचायत समितीच्या कार्यालयाच्या माध्यमातून 2019 नंतर झालेल्या मयत मतदार यांच्या याद्या गोळा करुन त्या गावनिहाय सर्व मतदान केंद्र अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना देण्यात यावेत; असेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!