
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय बॉक्सिंग (मुले/मुली) स्पर्धा, सन 2023-24 मध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटणची कु.गीतांजली बंडगर 52-55 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला तसेच कु. प्रियांका मदने 66 – 71किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व जिमखाना प्रमुख डॉ. पाटील एस. डी. यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


