उल्लेखनीय सेवेबद्दल सपोनि गणेश म्हेत्रस यांना राष्ट्रपती पदक


  

स्थैर्य, सातारा, दि. 14 : जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगन्नाथ म्हेत्रस यांना  उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहे. सपोनि म्हेत्रस सध्या पोलीस मुख्यालयातील महिला अत्याचार प्रतिबंध शाखेत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ते दुसर्‍यांना राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले असून त्यांच्यावर पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मूळचे महिमानगड, ता. माण गावचे सुपुत्र असलेल्या सपोनि म्हेत्रस यांची 32 वर्षे सेवा झाली आहे. 2008 साली त्यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह प्रदान करुन गौरवण्यात आले होते. 2006 मध्ये देखील त्यांनी पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते सातारा पोलीस मुख्यालयात महिला अत्याचार प्रतिबंध शाखेत कार्यरत असून त्यांनी कायदा, सुव्यवस्था, आंदोलने तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत त्यांना 2020 चे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस दलाला मिळालेली ही खास भेट असून लवकरच राज्यपालांच्या हस्ते खास समारंभात त्यांना हे पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

याबद्दल त्यांचा सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!