
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 14 : सातारा येथील यशश्री हॉस्पिटल येथील प्रतीक्षा कक्षातून एकाची 18 हजार रुपये व महत्त्वपूर्ण कागदपत्रे असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली.
याबाबत प्रसाद चांगदेव देशमुख हे मेडिकल रिप्रझेंटिव्ह आहेत. ते सदर बझार येथील यशश्री हॉस्पिटलमध्ये काही कामानिमित्त आले होते. रुग्णालयाच्या प्रतीक्षा कक्षातील बाकावर ते बसले होते. त्यांच्यासमवेत एक बॅग त्यांनी त्या बाकावर ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती बॅग लंपास केली. या बॅगेमध्ये रोख 18 हजार रोख रक्कम, तसेच विविध बँकांची सहा एटीएम, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती. याप्रकरणी प्रसाद देशमुख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार दष्टे तपास करत आहेत.
