माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी फलटण नगर परिषदेचे सर्व विभाग सज्ज

मुख्याधिकारी निखिल मोरे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ जून २०२४ | फलटण |
आषाढी वारीसाठी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. ९ जुलै २०२४ रोजी फलटण मुक्कामी असणार आहे. या पालखी सोहळ्याचे नियोजन पूर्ण झाले असून प्रशासनाचे सर्व विभाग सज्ज झाल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.

मुख्याधिकारी दिलेल्या माहितीनुसार,

१) बांधकाम विभाग :

पालखी मुक्काम तळावरील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती यामध्ये फलटण नगर परिषद हद्दीतील ९५ टक्के रस्त्यांची कामे झालेली आहेत. महाराजा हॉटेल ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते गोविंद डेअरी खडकहीरा ओढा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. सदर रस्ता सुस्थितीत आहे.

पाचबत्ती चौक ते गजानन चौक ते महात्मा फुले चौक मार्गे सफाई कामगार कॉलनी ते गिरवी नाका मार्गे विमानतळ पालखी मुक्काम स्थळापर्यंत रस्ता सुस्थितीत आहे.

पालखी निगमन मार्गातील विमानतळ ते डिएड चौक मार्गे श्रीउपळेकर महाराज मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुणे पंढरपूर रस्ता सुस्थितीत आहे.

मलटण फेमस मोबाईल शॉपी ते आग्रवाल घर ते स्वामी समर्थ मंदिर ते पाचबत्ती चौक असा सुमारे १.५० कि.मी. रस्त्यावर छोटे खड्डे आहेत. सदर खड्डे बुजविणे करीता नगरपरिषदे मार्फत पॅचवर्कचे काम सुरु आहे.

पालखी मार्गातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वृक्षांची छाटनी करणेत आलेली आहे. पालखी मार्गातील रोडराडा उचलणेचे काम करणेत आलेले आहे.

दरम्यान, पालखी मार्गावरील अतिक्रमणेही हटविणेत आलेली आहेत.

२) आरोग्य विभाग :

पालखी तळावरील स्वच्छतेचे नियोजन करणेबाबत फलटण नगरपरिषदेकडील सफाई कर्मचारी यांचेमार्फत श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाच्या ठिकाणची विमानतळ संपूर्ण साफसफाई, राडारोडा उचलणे, काटेरी झुडपे काढणे आदी कामे कर्मचारी व जेसीबीव्दारे पूर्ण झालेली आहे. शहरामधील राडारोडा व सफाई पूर्ण करण्यात आली आहे.

फलटण नगरपरिषदेकडील २ स्वच्छता निरिक्षक, ६ मुकदम, १३० कर्मचारी स्वच्छतेकरीता नियुक्त करणेत आलेले आहेत.

पालखी विश्वस्त मंडळ यांनी रस्ता मोकळा ठेवण्यास परवानगी दिल्यास कचरा संकलनाकरीता पालखी तळावर ६ घंटागाडया, २ ट्रॅक्टर ट्रॉली व २ टाटा ४०७ वाहने ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित १० घंटा गाडया, १ ट्रॅक्टर ट्रॉली, १ टाटा ६०७ वाहाने शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कुल, मलटण व इतर दिंडया उतरणेच्या ठिकाणी ठेवणेत येणार आहेत.

संकलन झालेल्या कचर्‍यावर फलटण नगरपरिषदेच्या घन कचरा प्रकल्प केंद्र येथे शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया केली जाते.

३) विद्युत विभाग :

पालखी तळावर पुरेशी प्रकाश व्यवस्था (जनरेटर) उपलब्ध होणे आवश्यक आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्काम फलटण येथील विमानतळ येथे असतो. या ठिकाणी कायमस्वरुपी विद्युत व्यवस्था नसल्याने नगरपरिषदेमार्फत ६ मोठे जनसेट (३० के. व्ही. क्षमतेचे) व १ जनसेट (७.५ के. व्ही. क्षमता राखीव तातडीची बाब म्हणून) असलेले जनसेट पालखी तळावर प्रकाश व्यवस्थेकरीता ठेवण्यात येतात.

निर्मलवारीतील शौचालयांकरीता १५ पोर्टेबल जनरेटर (३.५० के. व्ही. क्षमतेचे) उपलब्ध करुन दिले जातात.

४) आरोग्य विभागामार्फत शौचालयांची व्यवस्था :

तात्पुरत्या शौचालयांसाठी आरोग्य विभागाकडून ठिकाणे निश्चित
करणे व त्याबाबत फलक लावणे ती ठिकाणे, त्यांची संख्या व नेमलेले नगरपरिषद ठेकेदार अधिकारी / कर्मचारी पुढीलप्रमाणे –


शौचालय कोणत्या दिशेला आहे हे समजणेकरीता शौचालयाचे दिशा दर्शक स्त्री-पुरुष फलक नगरपरिषदे मार्फत लावणेत येतात.

फलटण नगरपरिषदेने पालखी आगमनापासून पालखी तळ नकाशा नगरपरिषदेने तयार केलेला आहे. पालखी मार्ग, एस.टी.बस थांबे, पाणी टँकर भरणे करीता फिलींग पाँईंट, पालखी तळ, शौचालये, पोलिस स्टेशन, चौकशी ऑफीस, तात्पुरता दवाखाना, दर्शनबारी, विद्युत टॉवर इ. महत्वाच्या बाबी दर्शविणेत आलेल्या आहेत. सोबत नकाशा जोडणेत आला आहे.

फलटण नगरपरिषदेतर्फे तात्पुरत्या शौचालयांचे पर्यवेक्षणाकरीता २४ बाय ७ पूर्ण वेळ पर्यवेक्षणासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणेत आली आहे.

आरोग्य विभागामार्फत तात्पुरत्या शौचालयांमधील मैल्याची विल्हेवाट लावणेकरीता जागा शोधणे व मैल्यावर प्रक्रीया करणेबाबत नियोजन करणेबाबत महसूल विभागामार्फत झिरपवाडी येथील बंद स्थितीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने मैल्यावर प्रक्रीया करणेत येणार आहे.

सदर मैला विल्हवाट लावणे करीता १५ मी. लांब १५ मी. रुंदीचा व १.९० मी. खोलीचा खड्डा घेतला जातो. यामध्ये मैला टाकुन त्यावर ओडोफ्रेश (दुर्गंधीनाशक) योग्य मात्रेत टाकले जाते. मातीचा लेअर करून खड्डा पूर्ववत भरणेत येतो.

५) पालखी सोहळ्यानंतरची स्वच्छता :

आरोग्य विभागाकडून पालखी सोहळा प्रस्थान केल्यानंतर स्वच्छतेबाबत नियोजन करण्यात आले आहे.

नगरपरिषदेकडील अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत स्वच्छता मोहीम राबविली जाते. यामध्ये २०० अधिकारी व कर्मचारीमार्फत साफसफाई केली जाते.

१६ घंटा गाडया, ४०७ वाहने २१ टाटा ६०७, ३ ट्रॅक्ट्रर ट्रॉली, २ जेसीबी मशिनव्दारे सफाई करणेत येते.

हायस्कुल, कॉलेज, विविध संस्था, एनजीओ यांचेमार्फत सुमारे १००० विद्यार्थी नागरिकांच्या सहभागातून पालखी तळावर पालखी पश्चात स्वच्छता करणेत येते.

पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बोटलस् एकत्रित गोळा केले जातात. तसेच प्लास्टीक गोळा करुन फलटण नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प येथे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते.

६) पालखी सोहळ्यादरम्यान पार्किंगची व्यवस्था :
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फलटण नगरपरिषदे मार्फत चौकशी ऑफीस उभारणेत येते. सोबत नगरपरिषदेकडील महत्वाचे मोबाईल क्रमांक यादी सोबत जोडणेत येत आहे. चौकशी ऑफीस येथे २४ बाय ७ अधिकारी व कर्मचारी उपस्थित ठेवणेत येतात.

माळजाई मंदिर रोड, सफाई कामगार रस्ता व डेक्कन चौक येथील पार्कींग मध्ये पार्कींग सुविधा करणेत येते.

७) पाणीपुरवठा विभाग :

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना व नागरिकांना पाणीपुरवठ्याची पुरेशी व्यवस्था केली जाते. त्यानुसार टँकर फिडींग पाणीपुरवठा पॉईंटवर २४ बाय ७ कर्मचारी उपस्थितीबाबतचे नियोजन केले जाते.

फलटण नगरपरिषदेच्यावतीने खालील प्रमाणे टँकर फिडींग पॉईंट उभारले जातात.

१. सुधारीत जलशुध्दीकरण केंद्र, (एकावेळी ८ टँकर भरले जातात)
२. खजिना हौद
३. जाधववाडी
४. भडकमकर नगर
५. जाधववाडी येथे निर्मलवारी करीता टँकर फिडींग पॉईंट स्वतंत्र असतो.

या सर्व ठिकाणी २४  ७ या वेळेत अधिकारी व कर्मचारी उपस्थित ठेवले जातात. सोबत कर्मचारी व अधिकारी यांचे मोबाईल क्रमांक जोडणेत येत आहेत. शुध्द पाणीपुरवठा देणेसाठी क्लोरीन वायु व तुरटी यांचा पुरेसा साठा करून ठेवणेत आला आहे. आवश्यक विद्युत मोटारी यांची दुरुस्ती करुन राखीव मोटारी ठेवणेत आल्या आहेत.

सुधारीत जलकेंद्र येथे वारकरी यांचे टँकर वाहतूक सुलभ होणेकरीता एकेरी वाहतुकीचे नियोजन केलेले आहे.

७) कर विभागामार्फत दुकाने व फेरीवाल्यांचे नियोजन :

दुकाने व फेरीवाले यांना जागा निश्चित करुन देणेकामी फलटण नगरपरिषदेकडील कर विभाग व पोलिस विभागाच्या मदतीने फेरीवाल्यांचे नियोजन केले जाते. नाना नानी पार्क व कोर्ट येथील दोन्ही पट्टयांमध्ये तसेच विश्रामगृह ते पोलिस स्टेशन पर्यंतच्या फुटपाटवर फेरीवाले यांना जागा निश्चित करुन दिली जाते.

पालखी तळावर फेरीवाले यांना प्रवेश दिला जात नाही.

८) विद्युत विभागामार्फत पालखी तळावर प्रकाश व्यवस्था :

पालखी तळावर प्रकाश व्यवस्थेकरीता ६ मोठे टॉवर्स उभारले जातात (उंची ३० फुट). या प्रत्येक टॉवर्सवर १६ फ्लड लाईट दिवे (मर्क्युरी) बसविलेले असतात. १५० एलएडी पालखी तळावर लावणेत येतात. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे थ्रीफेज कनेक्शन असते. सदर ठिकाणी आवश्यक क्षमतेचे जनसेटची सोय केली जाते.

९) पाणीपुरवठा विभागामार्फत वारकर्‍यांसाठी नळपाणी पुरविणे :

फलटण नगरपरिषदे मार्फत खालील ठिकाणी वारकर्‍यांकरीता तात्पुरत्या नळाने पाणीपुरवठा व्यवस्था केली जाते.
विमानतळ – ८ ठिकाणी, पोलीस चौकीजवळ ४ ठिकाणी, गिरवी नाका ८ ठिकाणी, माळजाई मंदीर लगत २ ठिकाणी, घडसोली मैदान – २ ठिकाणी.

उक्त ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो.

१०) अग्नीशमन व वाहन विभागामार्फत इतर सुविधा :

फलटण नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन निरा पाडेगांव, लोणंद, तरडगांव, फलटण पासुन बरड पर्यंत श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळया सोबत असते. या वाहनाची पाणी क्षमता ५ हजार लिटर इतकी आहे. यावर दोन ड्रायव्हर, ४ मदतनीस २४ बाय ७ उपलब्ध असतात.

फलटण नगरपरिषदेचे दुसरे अग्निशमन वाहन (पाणी क्षमता ५ हजार लिटर इतकी आहे. यावर दोन ड्रायव्हर, ४ मदतनीस ) खजिना हौद येथे तैनात ठेवणेत येते.

फलटण नगरपरिषदेमार्फत विमानतळ येथे चौकशी ऑफीस, आपत्कालिन मदत कक्ष, हिरकणी कक्ष उभारणेत येतो. ४. पालखी मुक्कामी स्थळी विमानतळ येथे नगरपरिषदेची रुग्णवाहीका व शववाहीका दोन ड्रायव्हर व दोन मदतनीसांसह तैनात केली जातात.

पालखी मार्गावर व पालखी स्थळावर नगरपरिषदेची क्रेन पुरविणेत येते. जेणे करुन मार्गामध्ये बंद पडलेली वाहने वेळेत हटविणे व वाहतुक सुरळीत करणेस मदत करणे.


Back to top button
Don`t copy text!