कोळकी येथे दुचाकींची धडक; एक ठार, दोन जखमी


दैनिक स्थैर्य | दि. २६ जून २०२४ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथील हाँटेल कोल्हापुरी कट्टाचे समोर दुचाकींच्या झालेल्या धडकेत एकजण ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

या अपघातात श्रीकांत गणपत काळुखे (रा. ग्रामपंचायतीजवळ कोळकी, ता. फलटण) हे ठार झाले असून राजेंद्र किसन जगताप (वय ५५, मूळ रा. पुरन, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा.अक्षतनगर, कोळकी, ता.फलटण) व ओवी अजित मुळीक हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी ११.३५ वा. चे सुमारास राजेंद्र किसन जगताप हे टीव्हीएस ज्युपीटर स्कुटी (क्र.एमएच ११ बीआर ६२७२) वरून त्यांची नात ओवी हीस शाळेतून घरी फलटण ते दहिवडी रस्त्याने दहिवडीुकडे जात असताना हॉटेल कोल्हापुरी कट्टाचेसमोर, कोळकी येथे पाठीमागून आलेल्या श्रीकांत गणपत काळुखे याने त्याच्या बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच ११ सीए ८१५५) वरून भरधाव वेगाने येऊन स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात पल्सरचालक श्रीकांत काळुखे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर स्कुटीवरील राजेंद्र जगताप व त्यांची नात ओवी मुळीक हे जखमी झाली आहे.

या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!