दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटणचे रहिवासी श्रीकांत गायकवाड यांनी तब्बल तीन एकर जमीन वृक्ष लागवडीसाठी गुंतवली. यामध्ये त्यांनी 400 वृक्ष लागवड करण्याचा निश्चय केला.
आता त्यांनी 300 वृक्ष चिंचेची लावली व 100 वृक्ष नारळ लावले.
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बिबी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे तलाव पाटबंधारे वरून वाहू लागले यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. गायकवाड यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.