दैनिक स्थैर्य । दि. 11 ऑक्टोबर 2021 । फलटण । सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य व ‘सॅटेलाईट रोटरी क्लब’चे मार्गदर्शक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सॅटेलाईट रोटरी क्लबच्यावतीने बाणगंगा जंगल ध्यास येथे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर उपक्रमांतर्गत श्रीमंत संजीवराजे यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या 57 रोपांचे रोपण यावेळी करण्यात आले. यावेळी डॉ. शांताराम गायकवाड, प्रा. सुधीर इंगळे, डॉ. महेश बर्वे यांच्यासह पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.