फलटण तालुका जनता दरबारात प्रलंबित तक्रारींवर सुनावणी; सर्व अधिकारी राहणार उपस्थित

फलटण तालुका जनता दरबारात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निरसन करण्यासाठी विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निरसन करण्यासाठी सोमवार, दि. ०७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या जनता दरबाराला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती असणार आहे.

अर्जाच्या प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन

जनता दरबारात सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फलटण तालुक्यातील ज्या नागरिकांनी अर्ज केले आहेत, त्यांनी आपल्या अर्जाच्या प्रतीसह सकाळी ११ वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे.

लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही राहणार उपस्थित

जनता दरबाराला फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

Back to top button
Don`t copy text!