दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२३ | फलटण |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची एकच जयंती फलटण तालुक्यात मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्याच्या नियोजनाच्या बैठकीमधून यावर्षीच्या फलटण तालुका अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते पै. बजरंग नाना खटके यांची सर्वांनुमध्ये निवड करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, विष्णूपंत लोखंडे, आप्पा लोखंडे, भिवरकर सर, शेखर खरात, मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र केसरी पै. बापूराव लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, आस्था टाइम्सचे संपादक दादासाहेब चोरमले, सरचिटणीसपदी यशवंत सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष महादेव सोनवलकर, ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे, खजिनदारपदी लक्ष्मण शेंडगे सर, सहसचिवपदी विजय भिसे, शंभूराजे शेंडगे, संदीप चोरमले, सहखजिनदारपदी निवृत्ती खताळ सर, राजाभाऊ चोरमले, प्रसिद्ध प्रमुखपदी दत्ता जानकर सर, संतोष बिचुकले, राजकुमार गोफणे, खंडेराव भिसे, संतोष सोनवलकर, सहकार्याध्यक्षपदी दादासाहेब महानवर, नवनाथ लोखंडे सर, विठ्ठल सोनवलकर, नाना भिसे आदींच्या निवडी आज फलटण येथील बिरोबा मंदिर येथे आयोजित बैठकीत करण्यात आल्या.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.