
दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२६ | फलटण |
सस्तेवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून २८०/- लिटर गावठी हातभट्टीची दारू, दोन लोखंडी कढई, जरमलये काळे पांढरे रंगाचे घमेले, बाभळीचे झाडाच्या साली, गुळाच्या ढेपा, तुरटी व जळण असे एकूण २,४६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, ता. फलटण जि. सातारा) यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, तर आरोपी कृष्णा ऊर्फ पप्या विश्वास पवार, गणेश मोहिते, रूपेश चव्हाण (सर्व रा. सोमवार पेठ, फलटण, ता. फलटण) यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही अशीच अवैध धंद्याबाबत मोहीम चालू राहील व अवैद्य धंद्यांबाबत गोपनीय माहिती दिल्यास नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, पोलीस उपअधीक्षक वैशाली कडुकर, फलटणचे उपविभागिय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सुचनांनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार अमोल जगदाळे पो. हवा. खरात, चतुरे, कदम, पो. कॉ. दडस यांनी केली.