फलटणच्या नूतन सभापती निवासचे उद्या उद्घाटन; मंत्री गोरे व रणजितदादांच्या हस्ते संपन्न होणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण पंचायत समितीच्या नूतन सभापती निवासस्थानाचा अधिकृत उद्घाटन सोहळा १ ऑगस्ट रोजी जयकुमार गोरे व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ जुलै : फलटण शहरातील पाचबत्ती चौकानजीक असलेल्या पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानाचा अधिकृत उद्घाटन सोहळा १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल.

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पाचबत्ती चौक परिसरातील हे शासकीय निवासस्थान सभापतींच्या प्रशासकीय व सामाजिक कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास फलटण तालुक्यातील नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले आणि गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!