
फलटणजवळील कोळकी येथे श्री राधाकृष्ण डेव्हलपर्सच्या सर्वसुविधायुक्त ३ बीएचके रो-हाऊसेसचे बुकिंग सुरू झाले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्थैर्य, कोळकी : फलटण शहरालगत असलेल्या कोळकी येथे बसस्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर ‘श्री राधाकृष्ण डेव्हलपर्स’च्या वतीने ‘श्री राधाकृष्ण व्हिलाज्’ हा ३ बीएचके रो-हाऊसेसचा सर्वसुविधायुक्त गृहप्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या बुकिंगला सुरुवात झाली असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सोयीसुविधा
कोळकी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागे, फलटण-शिंगणापूर रस्त्यालगत हा प्रकल्प वसलेला आहे. उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम आणि आकर्षक एलिव्हेशन ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र ७/१२ उतारा, प्रशस्त पार्किंग, मुबलक पाणीपुरवठा आणि तळमजल्यावर एक बेडरूमची सोय करण्यात आली आहे.
एनए व टीपी मंजूर लेआऊट
हा गृहप्रकल्प कलेक्टर एनए (NA) आणि टीपी (TP) मंजूर लेआऊटमध्ये असून, अंतर्गत ३० फुटी प्रशस्त रस्त्यांची सोय उपलब्ध आहे. मोक्याचे ठिकाण आणि आधुनिक डिझाइनमुळे स्वतःच्या आलिशान घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक नामी संधी आहे. अधिक माहिती व साईट व्हिजिटसाठी दिग्विजयसिंह माने यांच्या ७३८७५५२६७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
