फलटण पालखीतळ स्वच्छता अवघ्या एका दिवसात पूर्ण

फलटण येथील पालखीतळावरील २५ टनाहून अधिक कचरा एकाच दिवसात हटवून मैदान चकाचक करण्यात आले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार विक्रमी स्वच्छता.

स्थैर्य, फलटण, दि. 20 जुलै : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर फलटण येथील विमानतळ मैदानावरील २५ टनाहून अधिक कचरा अवघ्या एका दिवसात हटवण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार ही विक्रमी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

विक्रमी वेळेत मैदान चकाचक

दरवर्षी पालखी गेल्यानंतर विमानतळ परिसरातील कचरा हटवण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी फिरणे कठीण होत होते. मात्र, यंदा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष नियोजनामुळे अवघ्या एका दिवसात संपूर्ण मैदान चकाचक झाले आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले. या मोहिमेत फलटणसह कराड, महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच काही स्वयंसेवी संस्थांनीही या स्वच्छता मोहिमेत हातभार लावला.

पालखीतळाची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातर्फे संपूर्ण मैदानावर निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी या विक्रमी कार्यवाहीची माहिती दिली.

Back to top button
Don`t copy text!