लोणंद-फलटण मार्गावर मोठा अपघात; भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

लोणंद-फलटण रस्त्यावरील कापडगाव हद्दीत जेजुरी बायपाससमोर भरधाव चारचाकीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : लोणंद-फलटण रस्त्यावर कापडगाव हद्दीत जेजुरी बायपास महामार्गासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

धडकेत रावडी बुद्रुक येथील व्यक्तीचा मृत्यू

सुळवस्ती, रावडी बुद्रुक (ता. फलटण) येथील रोहित श्रीरंग सूळ (वय २३) आणि श्रीरंग बिरा सूळ (वय ५५) हे दोघे त्यांच्या मोटारसायकलवरून (एमएच ११- सीएक्स ७३७१) लोणंदकडून फलटणच्या दिशेने निघाले होते. ते कापडगाव हद्दीत जेजुरी बायपास महामार्गासमोर आले असता, पाठीमागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने (एमएच १२- डब्ल्यूएक्स ४३३७) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात श्रीरंग सूळ यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला, तर रोहित सूळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

संशयित चालकावर गुन्हा दाखल

या अपघाताप्रकरणी सर्जेराव बिरा सूळ (वय ५२, रा. रावडी बुद्रुक, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चारचाकीचा संशयित चालक विलास शिवाजी बाबर (रा. फुलेनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवालदार वाघ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!