

सात वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एका संशयितावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 08 जून : फलटण तालुक्यातील एका गावात सात वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एका संशयितावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या, त्यावेळी त्यांची सात वर्षांची मुलगी घरात होती. दुपारच्या सुमारास महिला घरी परतल्यानंतर मुलगी रडत त्यांच्याकडे आली. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हाताने खुणावून घरात बोलावून अयोग्य वर्तन केल्याचे मुलीने आपल्या आईला सांगितले.
हा प्रकार समजल्यानंतर महिलेने आपल्या पतीला याची माहिती दिली. त्यानंतर या दाम्पत्याने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दिली. ही घटना ५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.