साखरवाडी: मेघमाला खानविलकर यांचे निधन – परिसरात शोककळा

साखरवाडी येथील मेघमाला लालसिंगराव खानविलकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात तीन मुले असा परिवार आहे.

स्थैर्य, साखरवाडी, दि. ०८ जून : राष्ट्रीय कबड्डीपटू कै. लालसिंगराव खानविलकर यांच्या पत्नी मेघमला लालसिंगराव खानविलकर ऊर्फ नानी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साखरवाडी आणि फलटण तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.

मेघमला खानविलकर यांच्या पश्चात विक्रम खानविलकर, समरसिंघ खानविलकर आणि रुपसिंह खानविलकर अशी तीन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्ययात्रा साखरवाडी येथून काढण्यात आली. याप्रसंगी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!