

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रसिद्ध आडत व्यापारी नितीन नविनचंद्र दोशी यांचे ८ जून रोजी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असून व्यापारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ जून : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रसिद्ध आडत व्यापारी नितीन नविनचंद्र दोशी यांचे ८ जून रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५६ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे फलटणमधील व्यापारी क्षेत्रात आणि जैन समाजात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
नितीन दोशी हे फलटण बाजार समितीमधील नामांकित आणि प्रथितयश व्यापारी म्हणून परिचित होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी व्यापारी वर्गात आणि समाजात मोठा स्नेह कमावला होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, अखेर पुण्यात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, जावई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.