फलटण: प्रलंबित दिव्यांग निधी जमा करा – आंदोलनाचा इशारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण नगरपरिषदेने सन २०२५-२६ चा ५ टक्के दिव्यांग निधी ४५ लाभार्थ्यांना अद्याप दिलेला नाही. १० जूनपर्यंत निधी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ जून : फलटण नगरपरिषदेकडून देण्यात येणारा सन २०२५-२६ या वर्षातील ५ टक्के दिव्यांग निधी अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही. येत्या १० जूनपर्यंत हा प्रलंबित निधी खात्यात जमा न केल्यास नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिव्यांग बांधवांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

४५ लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत

फलटण नगरपरिषदेच्या वतीने एप्रिल महिन्यामध्ये काही दिव्यांग बांधवांना या निधीचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, शाखा फलटण येथील एकूण ४५ लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप हा निधी जमा झालेला नाही. या प्रलंबित निधीबाबत लाभार्थ्यांनी नगरपरिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

१० जूनची डेडलाईन

बँकेत प्रलंबित असलेला हा ५ टक्के दिव्यांग निधी त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा. १० जूनपर्यंत हा निधी जमा न झाल्यास फलटण नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!