फलटण: महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव – गुरू-शिष्य परंपरेचा जागर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयात सांस्कृतिक व एनएसएस विभागातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभाव व उत्साहात पार पडला. प्रतिमा पूजन करून प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

गुरू-शिष्य नात्याची समृद्ध परंपरा

विद्यार्थी प्रतिनिधी अमृता गायकवाड, ज्ञानेश्वरी साबळे, तृप्ती घाटे, मृणाल गिरमे, शिवांजली ढोबळे आणि तृष्णा पोंदकुले यांनी प्राध्यापकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गुरू हे केवळ शिक्षण देणारे नसून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवणारे मार्गदर्शक असतात, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

समाजहितासाठी ज्ञानाचा वापर करा

शिक्षणाचा उपयोग केवळ पदवी मिळवण्यासाठी न करता समाजहितासाठी करणे हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचे प्रा. डी. ए. कुलाळ यांनी सांगितले. माजी प्रा. सुरेश पवार यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले.

उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी आधुनिक शिक्षणासोबत चारित्र्य, शिस्त व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी करण्याचे सुचित केले. सारिका फडतरे हिने सूत्रसंचालन तर साक्षी खुसपे हिने आभार मानले.

Back to top button
Don`t copy text!