विडणी: गावात लोक अदालतीचे आयोजन – वाद मिटवण्याची संधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विडणी येथे विनामूल्य लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून प्रलंबित वाद सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थैर्य, विडणी, दि. ३० जुलै : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विडणी येथील श्री उत्तरेश्वर मंदिर मंडपात एक दिवसीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत.

प्रलंबित खटले विनामूल्य मिटवण्याची संधी

ग्रामपंचायत विडणी यांच्या वतीने आयोजित या लोक अदालतीमध्ये गावातील व परिसरातील वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले दावे, खटले, दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाचे वाद समोपचाराने निकाली काढण्यात येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे विनाशुल्क आणि तडजोडीच्या मार्गाने होणार आहे.

वेळेची व पैशाची होणार बचत

या उपक्रमामुळे नागरिकांच्या न्यायालयीन खर्चासह वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच परस्पर सामंजस्याने वाद मिटवून जलद न्याय मिळण्याची सुवर्णसंधी ग्रामस्थांना उपलब्ध झाली आहे. या लोक अदालतीचा सर्व संबंधित नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!