पेटीएम पेमेंट्स बँकेची यूपीआय लाइट सुविधा


दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२३ । मुंबई । भारतातील स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) यूपीआय लाइटसह कार्यरत झाली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना कधीच अयशस्वी न होणाऱ्या अत्यंत गतीशील यूपीआय पेमेंट्सची सेवा मिळाली आहे. यासह वापरकर्ते विनासायास व्यवहारांसाठी त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक बचत खात्यांशी लिंक केलेले त्यांचे यूपीआय लाइट अकाऊंट्स कार्यान्वित करू शकतात. वापरकर्ते एकाच क्लिकसह जवळपास २०० रूपयांपर्यंत जलद व एकसंधी पेमेंट्स करू शकतात. यूपीआय लाइट फक्त पेटीएम अॅपवर उपलब्ध आहे.

पेटीएम बँक यूपीआयमधील सर्वात मोठी संपादनकर्ता व लाभदायी बँक म्हणून पहिल्या क्रमांकाची बँक असण्यासोबत आघाडीची रेमिटर बँक देखील आहे. यूपीआय लाइटसाठी पहिली पेमेंट्स बँक म्हणून बँकेने आपल्या वापरकर्त्यांसाठी तंत्रज्ञान-नेतृत्वित नवोन्मेष्कारी सोल्यूशन्स निर्माण करण्याची परंपरा कायम ठेवली आहे आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.

अनेक लहान मूल्याच्या यूपीआय व्यवहारांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे सक्षम वैशिष्ट्य यूपीआय लाइट प्रथम पेटीएम अॅपवर लाँच करण्यात आले. यूपीआय लाइटसह वापरकर्ते यूपीआय व्यवहारांवर बँकेच्या मर्यादेबाबत चिंता न करता लहान मूल्य असलेले अनेक यूपीआय पेमेंट्स करू शकतात.

कार्यान्वित झाल्यानंतर यूपीआय लाइट जवळपास २०० रूपयांपर्यंतचे त्वरित व्यवहार करण्याची सुविधा देते, ज्यामधून सुनिश्चित व एकसंधी अनुभव मिळतो. दिवसातून दोनदा अधिकतम २,००० रूपये यूपीआय लाइटमध्ये भरता येऊ शकतात, ज्यामुळे दररोज एकूण ४,००० रूपयांपर्यंत मूल्याचा वापर करता येऊ शकतो.

तसेच, यूपीआय लाइटचा वापर करत केलेले पेमेंट्स पीपीबी वापरकर्त्यांच्या पासबुकला डि-क्लटर करतात. हे लहान मूल्याचे व्यवहार आता पेटीएम बॅलन्स व हिस्ट्री सेक्शनमध्ये दिसू शकतात. एनपीसीआयनुसार, वापरकर्त्यांना त्यांच्या बँकांकडून एसएमएसच्या रूपात यूपीआय लाइटच्या माध्‍यमातून केलेल्या सर्व पेमेंट्सची दैनंदिन व्यवहार हिस्ट्री मिळेल.


Back to top button
Don`t copy text!