पारनेरचे पाच नगरसेवक पाच दिवसांत पुन्हा शिवसेनेत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. ०८ : पारनेरमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या पाच नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर पोहचले आहेत. पारनेरचे नगरसेवक अजित पवारांकडे आले होते. त्यानंतर तेथून मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

पारनेर नगरपंचायतीमधील  शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथं राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. यात नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश होता. मात्र आता हे पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!