‘आपली फलटण मॅरेथॉन २०२५’चे ५ जानेवारीला आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १० सप्टेंबर २०२४ | फलटण |
अनेक नागरिकांच्या आग्रहाखातर आणि निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे यावर्षीची ‘आपली फलटण मॅरेथॉन’ ही रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ६ वाजता घेण्याचे योजिले आहे, अशी माहिती जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटणचे डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.

१ नोव्हेंबर २०२४ पासून रजिस्ट्रेशन ऑनलाईन ओपन होईल. www.joshihospitalpvtltd.com या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

या मॅरेथॉनचे गट पुढीलप्रमाणे :
१. १८ ते ३० (पुरुष/स्त्री) जोश पूर्ण युवा गट
२. ३१ ते ४५ (पुरुष/स्त्री) सळसळती तरुणाई
३. ४६ ते ६४ (पुरुष/स्त्री) प्रगल्भ प्रौढ
४. ६५ व त्यावरील (पुरुष/स्त्री) अनुभवी ज्येष्ठ.

पहिले तीन गट हे ५ कि.मी. , १० कि.मी. आणि १५ कि.मी. च्या मॅरेथॉनमध्ये आपल्या क्षमतेनुसार भाग घेऊ शकतात.

चौथा गट हा फक्त ३ कि.मी. ‘वॉकेथॉन’साठीच आहे .(ह्या गटाला रजिस्ट्रेशन फी माफ आहे).

आपली फलटण मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये :

  • नयनरम्य धावण्याचा मार्ग
  • मॅरेथॉन पूर्ण केल्याचे आकर्षक ‘मेडल’.
  • ई-सर्टीफिकेट
  • प्रत्येक धावपटूला एक ‘गुडी बॅग’, की ज्यामध्ये एक आकर्षक गिफ्ट असणार आहे.
  • मॅरेथॉननंतर मनसोक्त घरगुती आणि पौष्टिक नाष्टा.
  • पळताना‘हायड्रेशन ड्रिंक’ची उत्तम सोय.
  • मॅरेथॉननंतर जलद ‘रिकव्हरी’साठी ‘फिजिओथेरेपी सेल’.
  • पहिल्या तीन गटांना पुरुष व महिला यांना प्रत्येकी पहिल्या येणार्‍या तीनजणांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट व बक्षीस दिले जाणार आहे.

फलटणच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२५’मध्ये भाग घेऊन निरोगी, फीट आणि आनंदी जीवनाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटणचे डॉ. प्रसाद जोशी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!