वावरहिरेत प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


स्थैर्य, वावरहिरे , दि. २३:  वावरहिरे ता.माण येथे 72 व्या प्रजासत्ताक दिन आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त लोकशाहिर अण्णाभाऊसाठे क्रिकेट क्लब वावरहिरे यांच्या वतीने26,27,28,29जानेवारी रोजी भव्य-दिव्य हाप पीच  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेतील विजेता संघाला सात हजार एक रुपये रोख रक्कम व आकर्षक ट्राॅफी देण्यात येणार आहे.उपविजेता संघाला रोख रक्कम पाच हजार  एक रुपये मिळतील. तृतीय क्रमांकास रोख रक्कम तीन हजार एक तर चतुर्थ क्रमांकास रोख रक्कम दोन हजार एक अशी बक्षिस जाहिर करण्यात आली आहेत.  याशिवाय खेळाडुंना अनेक वैयक्तिक बक्षिसे दिली जातील.यास्पर्धेचा आनंद वावरहिरे व परिसरातील सर्व खेळाडु व  रसिकांनी घ्यावा असे अावाहन  साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे क्रिकेट क्लब कमिटी वावरहिरे यांच्या मार्फत करण्यात  आले.


Back to top button
Don`t copy text!